Chandrayaan-4 : ‘चांद्रयान-४’चे दोन टप्प्यांत प्रक्षेपण होणार; काय असेल त्यात खास? | पुढारी

Chandrayaan-4 : 'चांद्रयान-४'चे दोन टप्प्यांत प्रक्षेपण होणार; काय असेल त्यात खास?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आता चांद्रयान-४ (Chandrayaan-4) मोहिमेची तयारी करत आहे. विशेष म्हणजे चांद्रयान-४ मोहीम दोन टप्प्यांत प्रक्षेपित केली जाणार असून चंद्रावर मानवी मोहिमेला पाठवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चांद्रयान-४ मोहीम केवळ चंद्राच्या पृष्ठभागावरच उतरणार नाही, तर तेथून काही नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल.

संबंधित बातम्या : 

चांद्रयान-४ चंद्रावरून नमुने आणणार

भारताने २३ ऑगस्‍ट रोजी चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ चे लॅंडर उतरवले. अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या देदिप्‍यमान यशानंतर इस्रो आणि जपानची अंतराळ संशोधन संस्‍था एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) चांद्रयान-४ मोहिम राबवत आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, चांद्रयान-4 मोहिमेत पाच अंतराळ यान मॉड्यूल समाविष्ट केले जातील. तसेच, दोन रॉकेटच्या मदतीने दोन टप्प्यात प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-4 मध्ये फक्त चांद्रयान-3 मिशन प्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल नसतील तर दोन अतिरिक्त मॉड्यूल देखील असतील. हे दोन मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडक घेऊन पृथ्वीवर परत येतील.

Chandrayaan-4 : असे असतील ५ मॉड्यूल

चांद्रयान-4 मिशन अंतर्गत अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या पाच मॉड्यूल्स खालीलप्रमाणे असतील.

  • प्रोपल्शन मॉड्यूल : चांद्रयान-३ मोहिमेप्रमाणे प्रोपल्शन मॉड्यूल चांद्रयान-४ ला चंद्राच्या कक्षेत नेईल.
  • डिसेंडर मॉड्यूल : हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, जसे चांद्रयान-३ मिशनचे विक्रम लँडर चंद्रावर उतरले होते.
  • असेंडर मॉड्यूल : चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा केल्यानंतर ॲसेंडर मॉड्यूल लँडरपासून वेगळे होईल.
  • ट्रान्सफर मॉड्यूल : हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून असेंडर मॉड्यूल घेईल आणि चंद्राच्या कक्षेतून बाहेर येईल.
  • री-एंट्री मॉड्यूल : हे मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेले नमुने पृथ्वीवर परत आणेल.

चांद्रयान-4 (Chandrayaan-4) मोहिमेत इस्रो आपल्या LVM-3 आणि PSLV या दोन्ही रॉकेटचा वापर करेल. प्रथम LVM-3 लाँच व्हेईकल प्रोपल्शन मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल आणि एसेंडर मॉड्यूलसह ​​उड्डाण करेल. यानंतर, पीएसएलव्ही ट्रान्सफर मॉड्यूल आणि री-एंट्री मॉड्यूलसह ​​लॉन्च केले जाईल. इस्रो येत्या काही दिवसांत या मोहिमेबाबत अधिक माहिती देणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button