

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रोच्या प्रक्षेपण क्षमतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (दि.२७) तीन नवीन सुविधांचे उद्घाटन झाले. केरळमधील तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. इस्रोच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिलीच भेट होती. (ISRO Inaugurates Projects)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC), सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथे PSLV इंटिग्रेशन फॅसिलिटी (PIF) सह अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये इस्रोचे पीएसएलव्ही एकात्मता सुविधा, महेंद्रगिरी येथे अर्ध-क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा आणि VSSC येथील ट्रायसोनिक विंड टनेल आज (दि.२७) राष्ट्राला समर्पित केले. (ISRO Inaugurates Projects)
दरम्यान, तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. यावेळी, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यमंत्री मुरलीधरन आणि इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ देखील उपस्थित होते. (ISRO Inaugurates Projects)