ISRO INSAT-3DS Mission : हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपणासाठी ISRO सज्ज; जाणून घ्या 'या' मोहिमेविषयी | पुढारी

ISRO INSAT-3DS Mission : हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपणासाठी ISRO सज्ज; जाणून घ्या 'या' मोहिमेविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज (दि.१७) सायंकाळी ५.३५ वाजता आपला हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपित करणार आहे. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळावी हा या प्रक्षेपणाचा उद्देश आहे. INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या निमित्ताने ISRO अध्यक्षांनी आंध्र प्रदेशातील सुल्लुरपेट येथील श्री चेंगलम्मा मंदिरात प्रार्थना केली. (ISRO INSAT-3DS Mission)

ISRO INSAT-3DS Mission: INSAT मालिकेतील हा तिसरा उपग्रह

इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पूजा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘INSAT-3DS आज संध्याकाळी ५.३५ वाजता प्रक्षेपित होईल. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींच्या अचूक माहितीसाठी ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी तयार करण्यात आला आहे. उपग्रहांच्या इन्सॅट मालिकेतील हा तिसरा उपग्रह आहे. (ISRO INSAT-3DS Mission)

INSAT-3DS हवामानाची अचूक माहिती देणार

GSLV F14 रॉकेटद्वारे INSAT-3DS हा हवामान उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवेला जाणार आहे. या मोहिमेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला आहे. हे प्रक्षेपण अंतराळाच्या जगात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. (ISRO INSAT-3DS Mission)

हवामान संस्थांसाठी महत्त्वाचा उपग्रह

INSAT-3DS हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

INSAT-3DS चे ‘नॉटी बॉय’ च्या माध्यमातून होणार प्रक्षेपण

हवामान उपग्रह INSAT-3DS ज्या उपग्रहातून प्रक्षेपित केला जाणार आहे, त्या GSLV F14 रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असेही म्हणतात. याचाच अर्थ खोडकर मुलगा असा आहे. GSLV F14 चे हे १६ वे मिशन असणार आहे. यापूर्वी GSLV F14 द्वारे प्रक्षेपित केलेल्या ४० टक्के मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. ISRO ने सांगितले की आज प्रक्षेपित होणारा हवामान उपग्रह INSAT-3DS 2013 मध्ये प्रक्षेपित केलेल्या हवामान उपग्रह INSAT-3D ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. हा उपग्रह हवामानाची चांगली माहिती प्रदान करेल, असा विश्वासदेखील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे.

Image

हेही वाचा:

Back to top button