

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर मुलाखतीचा अपूर्ण भाग पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. बदनामी करण्याच्या उद्देशाने मुलाखतीचा संदर्भ आणि अर्थ लपवून १९ सेकंदाचा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केल्याचा आरोप गडकरी यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर २४ तासांच्या आत पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. तसेच तीन दिवसांत लेखी माफी मागण्याची मागणीही केली आहे. ही व्हिडीओ क्लिप वस्तुस्थितीनुसार चुकीची आहे. काँग्रेस नेत्यांनी आपला अपमान करण्यासाठी हा जाणूनबुजून प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांमध्ये वैचारिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे. या क्लिपमुळे बदनामी होत असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गडकरी असे म्हणताना ऐकू येत आहे की, "खेडे, गरीब, मजूर आणि शेतकरी दु:खी आहेत. गावांमध्ये चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत."
हेही वाचा :