पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. लोकपाल हे पद मे २०२२पासून रिक्त होते. खानविलकर हे मुळचे पुण्यातील आहेत. ( Ex-Supreme Court Judge AM Khanwilkar Appointed As Lokpal Chairperson )
पिनाकी चंद्रा घोष यांच्या निवृत्तीनंतर लोकपाल पद रिक्त होते. झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहांती यांच्याकडे लोकपाल पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.
अजय माणिकराव खानविलकर यांचा जन्म ३० जुलै १९५७ ला पुण्यात झाला. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर मुंबईतील के. सी. लॉ कॉलेजमध्ये त्यांनी कायद्यातील पदवी घेतली. १९८२ला त्यांना वकिल म्हणून कामाला सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायलयांत त्यांनी दिवाणी, फौजदारी तसेच घटनात्मक खटले त्यांनी चालवले. १९८४ला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९८९पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्याचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहिले. १९९४ला सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अॅमिकस क्युरी म्हणून जबाबदारी सांभाळली. २९ मार्च २०००ला त्यांची नियुक्त मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून झाली. पुढे हिमचाल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या उच्च न्यायालयात ते मुख्य न्यायमूर्ती झाले आणि १३ जून २०१६ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
लोकपाल आणि लोकायुक्त कायदा २०१३ नुसार लोकपाल ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी यांच्यावरील भ्रष्टाचाराची चौकशी लोकपाल, लोकायुक्त करत असतात. लोकपालचे चेअरमन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतात. देशाचे सार्वजनिक जीवन भ्रष्टाचार मुक्त करणे हे लोकपालचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा