कौटुंबिक पक्ष देशासाठी चिंतेचा विषय ः पंतप्रधान | पुढारी

कौटुंबिक पक्ष देशासाठी चिंतेचा विषय ः पंतप्रधान

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा ; कौटुंबिक पक्ष देशासाठी चिंतेचा विषय बनले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांचे नाव न घेता केली. विशेष म्हणजे काँग्रेससहित 14 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

मोदी म्हणाले, कौटुंबिक पक्ष याचा अर्थ असा नव्हे की, एका घरातले खूप लोक राजकारणात यावेत. तर याचा अर्थ असा आहे की, संबंधित पक्षाचे नेतृत्व पिढ्यान्पिढ्या त्याच कुटुंबातील लोकांच्या हातात राहते. संविधान दिनाचा हा कार्यक्रम कोणत्या सरकारने नाही, कोणा पंतप्रधानाने नाही तर लोकसभा अध्यक्षांनी आयोजित केला आहे. आपण ज्या मार्गाने चाललो आहोत, तो मार्ग योग्य आहे की नाही,

याचे मूल्यांकन व्हावे याकरिता देखील संविधान दिनाचे आयोजन केले जाते. याप्रसंगी आपण महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद यांना नमन करतो.आपले संविधान म्हणजे हजारो वर्षांची महान परंपरा, अखंड प्रवाहाची अभिव्यक्ती आहे. राष्ट्रहित सर्वात आधी होते, त्याचमुळे घटनेची निर्मिती होऊ

Back to top button