UP Explosion at firecracker factory: उ. प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; चार ठार, १८ जखमी | पुढारी

UP Explosion at firecracker factory: उ. प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; चार ठार, १८ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील नगर परिषद भारवारी झोपडपट्टीत फटाक्यांचा कारखान्‍यात स्‍फाेट झाला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास झालेल्‍या या दुर्घटनेत कारखाना जमीनदोस्त झाला. यामध्‍ये चार जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (UP explosion at firecracker factor)

कौशांबी येथील फटाके कारखान्यातील स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून शेकडो लोक कारखान्याकडे धावले. सगळीकडे आरडाओरडा सुरू होता. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना प्रयागराजमधील एसआरएन रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. (UP explosion at firecracker factor)

हेही वाचा:

Back to top button