HCES Survey In India: मागील दशकभरात कुटुंबाच्या मासिक खर्चात 'दुप्पट' वाढ; जाणून घ्या 'NSSO' सर्वेक्षण काय सांगते? | पुढारी

HCES Survey In India: मागील दशकभरात कुटुंबाच्या मासिक खर्चात 'दुप्पट' वाढ; जाणून घ्या 'NSSO' सर्वेक्षण काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या एका दशकात कुटुंबांचा मासिक खर्च दुपटीने वाढला आहे, अशी माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) सर्वेक्षणातून समोर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत या सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्र सरकारने शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले आहेत. (HCES Survey In India)

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत NSSO ने ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 पर्यंत घरगुती वापर खर्च सर्वेक्षण (HCES) केले. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्र सरकारने २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. देशातील प्रत्येक कुटुंबांचा दरडोई मासिक खर्च 2011-12 च्या तुलनेत 2022-23 मध्ये दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश घरगुती मासिक दरडोई उपभोग खर्च (MPCE) आणि देशातील ग्रामीण आणि शहरी भाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि विविध सामाजिक-आर्थिक गटांसाठी त्याचे वितरण यांचे स्वतंत्र अंदाज तयार करणे आहे. (HCES Survey In India)

HCES Survey In India : असे झाले सर्वेक्षण

देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील 2,61,746 कुटुंबांकडून (ग्रामीण भागात 1,55,014 आणि शहरी भागात 1,06,732) गोळा केलेल्या डेटावर आधारित हा निष्कर्ष काढण्यात आले आहे. गेल्या दोन दशकांत ग्रामीण आणि शहरी कुटुंबांमधील सरासरी मासिक खर्च जवळपास सारखाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. नवीन सर्वेक्षणानुसार, 2011-12 पासून सध्याच्या किंमत भारतीय शहरी कुटुंबांमध्ये सरासरी मासिक दरडोई खर्च (MPE) 2,630 रुपयांवरून 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे. ग्रामीण कुटुंबांमध्ये 1,430 रुपयांवरून 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे.

हेही वाचा:

 

Back to top button