Loksabha Election 2024 : भारत जोडो नाही, तर भारत तोडो यात्रा: शिवराजसिंह चौहानांची राहुल गांधीवर टीका

Loksabha Election 2024 : भारत जोडो नाही, तर भारत तोडो यात्रा: शिवराजसिंह चौहानांची राहुल गांधीवर टीका
Published on
Updated on

 शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा: देशाला स्वातंत्र्यप्राप्ती मिळाल्यानंतर काँग्रेसने देशाचा विश्वास घात केला, देशाला अखंड भारत नाही. तर खंडित भारत दिला. हे काँग्रेसने केलेले फार मोठे पाप आहे. सध्या काँग्रेसने सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा सुरू आहे. काश्मीरमध्ये दोन विधान, दोन प्रधान, दोन निशाण चालणार नाही, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. काश्मीरमधील 370 कलम हटवून हा तेथील संघर्ष थांबविला, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी आज (दि.२४) केले. ते  शिरोली पुलाची येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते. Loksabha Election 2024

ते म्हणाले की, 2014 पूर्वी भारत  देश घोटाळ्यांचा देश म्हणून जगात हिणवला जात होता. पण मोदींनी हे सर्व चित्र बदलून विकासनशील प्रगतीची गंगा आणल्याने जगामध्ये भारत देशाचे नाव अभिमानाने घेतली जाऊ लागले. त्यामुळे भारत हा एक दिवस विश्वगुरू नक्कीच बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मध्य प्रदेश हे राज्य आजारी राज्य होते. भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर हे विकसित करण्यात आले. देशामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन घेणारे राज्य म्हणून आज नावलौकिकास आले आहे. लाडली लक्ष्मी बेटी लखपती बेटी या योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये मुलींचा दर हा 1000 मुलांच्या मागे 976 वर पोहोचला. तो पूर्वी 912 असा होता. राज्यातील एक कोटी 32 लाख महिलांच्या खात्यावर योजनेतून पैसा जमा केल्यामुळे त्या महिलांची इज्जत गावामध्ये व घरामध्ये वाढलेली आहे.  Loksabha Election 2024

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाची संस्कृती व आदेश नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पाळला जातो. याचे उदाहरण म्हणजे २०२१ साली विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांनी वरिष्ठांच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. व प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत करण्याचा आदेश दिल्यावर अमल महाडिक यांनी मदत करून त्यांना बिनविरोध विजयी होण्याची संधी दिली, असे सांगून सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.

सुरेश हळवणकर म्हणाले की, मोदींना हटवण्यासाठी एकही सक्षम नेता विरोधकांकडे नाही. देशामधील पंचवीस कोटी गरीब लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम प्रामुख्याने मोदी सरकारने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईट का जवाब पत्थर से ही भूमिका ठेवल्याने अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आज भारताचा जगावर धाक आहे. प्रो ऊर्जा सारखी योजना गरिबांसाठी आणली असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, असे मत हळवणकर यांनी व्यक्त केले.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडून जाणारा खासदार असावा, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्यरेषेखालील 25 कोटी लोकांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम केले आहे. देशामध्ये 80 करोड लोकांना मोफत धान्य मिळत आहे. पुढील प्रत्येक शंभर दिवसासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन भाजप सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुणराव इंगवले, लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे, अशोकराव स्वामी, सुशांत पाटील, अशोक माने, पुष्पा पाटील, दीपक यादव,  माजी उपसरपंच कृष्णात करपे, विठ्ठल पाटील आदी  उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news