पंजाबच्या शंभू सीमेवर शेतकऱ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू | पुढारी

पंजाबच्या शंभू सीमेवर शेतकऱ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी ज्ञान सिंह यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांना पंजाबमधील राजपुरा सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना पटियालातील राजिंदरा रुग्णालयात नेण्यात आले. इथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मार्चमध्ये ते तीन दिवसांपासून सहभागी होते.

संबंधित बातम्या –

शेतकऱ्यांच्याच्या एमएसपीवर कायदा होण्याची मागणीचे विरोध-आंदोलन दरम्यान या शेतकऱ्याचा मत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणाच्या अंबालाजवळ शंभू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांपैकी एका ६३ वर्षीय ज्ञान सिंह यांचा हार्ट ॲटॅकने मृत्यू झाला. पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात राहणारे ज्ञान सिंह दोन दिवस आधी शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी शंभू सीमेवर आले होते.

शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने दिल्ली चलो आंदोलनाचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन सुरु केले आणि तेव्हापासून पंजाब आणि हरियाणा येथील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या आहे.

 

Back to top button