Mexico City News : वारंवार टॉयलेटला गेल्याने विमानातून खाली उतरविले | पुढारी

Mexico City News : वारंवार टॉयलेटला गेल्याने विमानातून खाली उतरविले

मेक्सिको सिटी : वारंवार टॉयलेटचा वापर केल्याबद्दल आपल्याला मेक्सिकोत विमानातून बाहेर काढण्यात आल्याचा दावा योहाना चिऊ नामक प्रवासी महिलेने केला आहे. ( Mexico City News )

संबंधित बातम्या 

वेस्ट जेटच्या विमानातून ती प्रवास करणार होती. या महिलेचे पोट बिघडले होते. त्यामुळे तिला अनेकदा टॉयलेटमध्ये जावे लागले. मात्र विमानातील कर्मचार्‍यांना रुचली नाही. त्यातील एकाने टेकऑफपूर्वीच तिला विमानाबाहेर काढले. या महिलेने त्या वादंगाचा एक व्हिडीओ तयार करून घडलेली सगळी घटना सोशल मीडियावर शेअर केली.

विमान पकडण्याच्या गडबडीत त्यांचे पैसेही हॉटेलवर राहिले. विमानतळ ते हॉटेल यादरम्यानचा प्रवासखर्च विमान कंपनीने आपल्याला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, त्याबद्दलही विमान कंपनीने कानांवर हात ठेवले. दरम्यान, असे अनुभव आलेल्या अन्य प्रवाशांनी लिऊ यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. ( Mexico City News )

Back to top button