Share Market Closing Bell | Sensex-Nifty ची घसरण, गुंतवणूकदारांना ७.५१ लाख कोटींचा फटका, आज काय घडलं?

Share Market Closing Bell | Sensex-Nifty ची घसरण, गुंतवणूकदारांना ७.५१ लाख कोटींचा फटका, आज काय घडलं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांदरम्यान सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. आज बाजारात नफावसुली दिसून आली. यामुळे सेन्सेक्स आज ५२३ अंकांनी घसरून ७१,०७२ वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ५० निर्देशांक १६६ अंकांच्या घसरणीसह २१,६१६ वर स्थिरावला. आज दुपारच्या सत्रात बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांवर मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. मुख्यतः बँक स्टॉक्समध्ये मोठे नुकसान झाले. BSE मिडकॅप निर्देशांक २.६ टक्के आणि स्मॉलकॅप ३ टक्क्यांनी घसरला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाची क्षेत्रीय पातळीवर सर्वात खराब कामगिरी राहिली. Nifty PSU Bank ४ टक्क्यांहून अधिक घसरला. (Share Market Closing Bell)

निफ्टी आयटी आणि फार्मा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले. निफ्टी मीडिया आणि पीएसयू बँक निर्देशांक यांची कामगिरी खराब राहिली. कॅपिटल गुड्स, मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी हेही घसरले, तर हेल्थ केअर आणि आयटी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.५१ लाख कोटींची घट

बाजारातील चौफेर विक्रीच्या दबावामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.५१ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. ९ फेब्रुवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल एकूण ३८६.३६ लाख कोटी रुपये होते. आज १२ फेब्रुवारी रोजी हे बाजार भांडवल ३७८.८५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.५१ लाख कोटी रुपयांची घट झाली.

सेन्सेक्सवर एनटीपीसी, टाटा स्टील, एसबीआय, इंडसइंड बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स टॉप लूजर्स राहिले. तर विप्रो, एचसीएल टेक, एम अँड एम, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टीवर कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, ओएनजीसी आणि एनटीपीसी यांची घसरण झाली. तर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, अपोलो हॉस्पिटल्स, विप्रो, डिव्हिस लॅब्स आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज हे शेअर्स वाढले. (Share Market Closing Bell)

डिसेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात २६५ टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर होनासा कंझ्युमर (मामाअर्थ) चे शेअर्स आज वाढले. हा शेअर्स आज ४७४ रुपयांपर्यंत वाढला. त्यानंतर १ टक्के वाढीसह हा शेअर्स ४३८ रुपयांवर स्थिरावला.

येस बँकेचे शेअर्स नफा वसुलीमुळे सोमवारी इंट्राडे ट्रेडमध्ये जवळपास १० टक्क्यांनी घसरून NSE वर २८ रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये हे शेअर्स सुमारे ४० टक्क्यांनी वाढले आहेत. (YES Bank Share Price)

जागतिक बाजार

हाँगकाँग आणि दक्षिण कोरियासह बहुतांक आशियाई बाजार सोमवारी बंद होते. तर चिनी बाजार आठवडाभर बंद राहणार आहेत. गेल्या शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजार वाढून बंद झाला होता.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी १४२ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४२२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news