Pakistan General Election 2024 | पाकिस्तानात मतदानादिवशीही हिंसाचार, मतदान केंद्रावरील गोळीबारात पोलिसाचा मृत्यू | पुढारी

Pakistan General Election 2024 | पाकिस्तानात मतदानादिवशीही हिंसाचार, मतदान केंद्रावरील गोळीबारात पोलिसाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये आज (दि.८) संसदेच्या नॅशनल असेंब्ली आणि चार प्रातांच्या विधानसभांसाठी निवडणुका होत आहेत. दरम्यान येथील मतदान केंद्रावर मतदानावेळीच गोळीबार झाला. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिला आहे. (Pakistan General Election 2024)

पाकिस्तानमधील राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभांसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले आहे. एकूण ३३६ जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या टँक भागातील मतदान केंद्रावर गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त एआरवाय न्यूजने दिली आहे. (Pakistan General Election 2024)

तर डॉनच्या वृत्तानुसार, मतदान प्रक्रिया सकाळी 8 वाजता (स्थानिक वेळेनुसार) 12 कोटी मतदारांसह सुरू झाली आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) सुरू राहील. पाकिस्तानच्या कार्यवाहक अंतर्गत मंत्रालयाने सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान पाकिस्तानमधील एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पाकिस्तानातील ही निवडणूक पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे, ही निवडणूक अशा वेळी होत आहे जेव्हा देश राजकीय आणि आर्थिक अशा अनेक आव्हानांना तोंड देत आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Pakistan General Election 2024)

हेही वाचा:

 

Back to top button