Pakistan Elections 2024 : पाकिस्तानमध्ये मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित | पुढारी

Pakistan Elections 2024 : पाकिस्तानमध्ये मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित

ढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात गुरुवारी (8 फेब्रुवारी) सार्वत्रिक मतदान होत असून, देशभरातील मतदान केंद्रांवर 6 लाखांवर सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. पोलिस, नागरी सुरक्षा बल तसेच सशस्त्र बलाचे जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतदान केंद्रांवर असेल. सकाळी 8 वाजलेपासून मतदान सुरू आहे. सायंकाळी 5 पर्यंत विनाअवकाश ते सुरू राहील. (Pakistan Election) दरम्यान पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.  असे वृत्त स्थानिक माध्यमांनी  दिले आहे. (Pakistan Elections 2024 )

Pakistan Elections 2024 :  देशभरातील मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित

12.85 कोटींवर मतदार आपला हक्क बजावतील. पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय संसदेसाठी 5 हजार 121 उमेदवार मैदानात आहेत. 12 कोटी 85 लाख 85 हजार 760 नोंदणीकृत मतदार आहेत. उमेदवारांमध्ये 4 हजार 807 पुरुष, 312 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर आहेत. चार प्रांतीय विधानसभांसाठी 12 हजार 695 उमेदवार मैदानात आहेत. त्यात 12 हजार 123 पुरुष, 570 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंजाबात सर्वाधिक 7 कोटी 32 लाख 7 हजार 896 मतदार आहेत. त्यापाठोपाठ सिंधमध्ये 2 कोटी 69 लाख 94 हजार 769, खैबर पख्तुनख्वाँमध्ये 2 कोटी19 लाख 28 हजार 119, बलुचिस्तानात 53 लाख 71 हजार 947 आणि राजधानी इस्लामाबादेत 10 लाख 83 हजार 29 मतदार आहेत. निवडणूक आयोगाने देशभरात 9 लाख 7 हजार 675 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. पुरुष मतदातारांसाठी 25 हजार 320, तर महिलांसाठी 23 हजार 952 केंद्रे आहेत. 41 हजार 403 मतदान केंद्रे संमिश्र स्वरूपाची आहेत.

पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांनी  दिले आहे की, “संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने देशभरातील मोबाईल सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

Back to top button