Jharkhand New CM: झारखंडमध्ये चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? | पुढारी

Jharkhand New CM: झारखंडमध्ये चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंड मुक्ती मोर्चाचे ‘चंपाई सोरेन’ आज (दि.२) झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी JMM विधिमंडळ पक्षाचे नेते सोरेन यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. (Jharkhand New CM)

झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार आलमगीर आलम म्हणाले की, येत्या 10 दिवसांत आपल्याला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. सोरेन यांनी आपल्याला ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सर्व आमदारांच्या समर्थनाचा व्हिडिओही त्यांनी राज्यपालांना दाखवला आहे. (Jharkhand New CM)

झारखंडमध्‍ये सरकार स्‍थापनेची प्रक्रिया लवकरच : चंपाई सोरेन

जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (‘ईडी’) अधिकार्‍यांनी बुधवारी अटक केली. तत्‍पूर्वी त्‍यांनी झारखंडच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणाही झाली. काल (दि.१) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. आम्‍ही राज्‍यपालांकडे सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. आता राज्‍यात लवकरच सरकार स्‍थापनेची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. (Jharkhand New CM)

संबंधित बातम्या

चंपाई सोरेन यांचीच मुख्‍यमंत्रीपदी निवड कशी झाली ?

जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्‍यापूर्वीच हेमंत सोरेन यांनी त्‍यांचे मोठे बंधू चंपाई सोरेन यांची मुख्‍यमंत्रीपदी निवड होण्‍याचे संकेत दिले होते. झारखंडमधील सत्ताधारी महाआघाडीच्या आमदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्‍यांनी सोरेन यांना JMM विधिमंडळ पक्षाचे सुप्रीमो म्हणून घोषित केले. हेमंत सोरेनचे वडील शिबू सोरेन यांच्यासह चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच ते हेमंत सोरेन यांचे अत्‍यंत विश्वासू आहेत. त्‍याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हान भागातील आहेत. याच भागातून राज्‍यातला आतापर्यंत तीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. अर्जुन मुंडा (2010 ते 2013) आणि रघुवर दास (2014 ते 2019) यांच्यासह काँग्रेसचे मधु कोडा हे याच भागातून येतात. मागील म्‍हणजे २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीत कोल्‍हानमध्‍ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्‍यामुळेच चंपाई सोरेन यांना हेमंत सोरेन यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडणे हा भाजपसाठी झारखंड मुक्‍ती मोर्चाने धक्‍कातंत्राचा वापर केल्‍याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘टायगर ऑफ कोल्हन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंपाई सोरेन हे कोल्हान भागात आपले वर्चस्‍व राखण्‍यात यशस्‍वी होतील, असे मानले जात आहे

हेही वाचा:

 

Back to top button