Jharkhand CM Hemant Soren: जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना ED कडून समन्स | पुढारी

Jharkhand CM Hemant Soren: जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना ED कडून समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क: जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स बजावले आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना २४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी, ईडीने १४ ऑगस्ट रोजी सोरेन यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तातडीच्या कामाचे कारण देत, सोरेन यांनी ईडीसमोर (Jharkhand CM Hemant Soren) हजर राहण्याचे टाळले होते. यानंतर ईडीने पुन्हा २४ ऑगस्टला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे, असे वृत्त ‘NDTV‘ ने दिले आहे.

ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ईडीने सोरेन यांना एकदा समन्स बजावले होते. या वर्षापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्येही बेकायदेशीर खाण प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांची चौकशी केली होती. हेमंत सोरेन हे सध्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात ईडीच्या कचाट्यात आहेत.

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात रांचीच्या चेशायर होम रोडमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी आणि लष्कराची जमीन खरेदी-विक्री केल्याचा आरोप झारखंड मुख्यमंत्री सोरेन यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर आहे. रांची विभागाचे तत्कालीन आयुक्त नितीन मदन कुलकर्णी यांच्या अहवालाच्या आधारे तपास सुरू आहे. लष्कराने ताब्यात घेतलेल्या जमिनीसंदर्भात चौकशी करून आयुक्तांनी सरकारला अहवाल सादर केला. बनावट नाव आणि पत्त्याच्या आधारे लष्कराच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचे अहवालात (Jharkhand CM Hemant Soren) म्हटले आहे.

जमीन घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश, रांचीचे माजी उपायुक्त छवी रंजन, कोलकाता येथील व्यापारी अमित अग्रवाल, न्यूक्लियस मॉलचे मालक विष्णू अग्रवाल आणि सीओ भानुप्रताप यांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीदरम्यान काही राजकारण्यांची नावेही समोर आली होती.

हेही वाचा:

Back to top button