

पुढारी ऑनलाईन : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. या विरोधात सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. दरम्यान, त्यांनी ईडीला पत्र लिहित न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
रांची येथील जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने पहिल्यांदा हेमंत सोरेन यांना समन्स जारी करत १४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पण ते चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यांनी एका कर्मचाऱ्यांमार्फत एक पत्र पाठवून ईडीचे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता. केंद्रीय तपास यंत्रणा गेल्या वर्षाहून अधिक काळापासून मुख्यमंत्र्यांना निशाणा बनवत आहे. आपण केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत नसल्याने आपल्यावर कारवाई केला जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा डझनहून अधिक जमीन घोटाळा प्रकरणांची चौकशी करत आहे. दरम्यान, त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात २४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हे ही वाचा :