Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे नॉट रिचेबल मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर रांचीत दाखल, आमदारांची घेतली बैठक | पुढारी

Jharkhand CM Hemant Soren | झारखंडचे नॉट रिचेबल मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर रांचीत दाखल, आमदारांची घेतली बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन गेल्या ३० तासांहून अधिक तास नॉच रिचेबल होते. मात्र, नॉट रिचेबल मुख्यमंत्री सोरेने हे मंगळवारी दुपारी रांची येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी रांचीत तत्काळ आमदारांची बैठक घेतली. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही बैठकीला उपस्थित होत्या. असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Jharkhand CM Hemant Soren)

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान काल झालेल्या चौकशीनंतर त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नव्हाता. मात्र आज दुपारी अचानक ते त्यांचा रांची येथील निवासस्थानी पोहचले. यानंतर सोरेन यांनी निवास्थानी पोहोचताच राज्याचे मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. (Jharkhand CM Hemant Soren)

सोरेन यांच्या दिल्लीतील निवास्थानावरून मुद्देमाल जप्त

कथित जमीन फसवणूक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी सोरेन यांच्या दिल्लीतील शांती निकेतनमधील घरासह ३ ठिकाणी छापेमारी केली होती. दरम्यान, ईडी पथक सोमवारी रात्री उशिरा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर पडले. कारण ते मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी करू शकले नाहीत. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार आणि कागदपत्रे असलेली बॅग तेथून निघताना जप्त केली. (Jharkhand CM Hemant Soren) तसेच त्यांच्या घरातून ३६ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. (Jharkhand CM Hemant Soren)

शासकीय निवासस्थान, राजभवन परिसरात १४४ लागू

या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांचे शासकीय निवासस्थान, राजभवन आणि रांची येथील ईडी कार्यालयाच्या १०० मीटरच्या क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत जेएमएमचे आमदार सोरेन यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी थांबले होते. कथित जमीन फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीच्या पथकाने त्यांची चौकशी करण्यासाठी तेथे भेट दिली होती.

हेही वाचा:

 

Back to top button