Katrina Kaif : रस्‍ते कसे हवेत, कॅटरीनाच्‍या गालांसारखे! : राजस्‍थानच्‍या नूतन मंत्र्यांची जीभ घसरली | पुढारी

Katrina Kaif : रस्‍ते कसे हवेत, कॅटरीनाच्‍या गालांसारखे! : राजस्‍थानच्‍या नूतन मंत्र्यांची जीभ घसरली

जयपूर : पुढारी ऑनलाईन

नुकतेच मंत्रीपद मिळाले. त्‍यामुळे सत्तेची धुंदी इतकी की, आपण काय बोलतोय याच भानच त्‍यांना राहिले नाही. मंत्रीपद मिळाल्‍यानंतर गावात त्‍यांचे जंगी स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी ग्रामस्‍थांनी गावातील रस्‍ते तेवढे चांगले करा, अशी मागणी केली. या मागणीने भारावलेल्‍या मंत्री राजेंद्र गुढा यांनी आपण काय बोलतोय याचे भानच राहिले नाही. ते म्‍हणाले की, मला गावातील रस्‍ते अभिनेत्री कॅटरीना कैफच्‍या  ( Katrina Kaif : )  गालांसारखे करायचे आहेत. त्‍यांचे हे वादग्रस्‍त विधान राजस्‍थानमध्‍ये चर्चेचा विषय ठरले आहे.

उत्‍साहाच्‍या भरात मंत्री गुढा यांची जीभ घसरली

नुकतेच राजस्‍थान मंत्रीमंडळाचा विस्‍तार झाला. यामध्‍ये राजेंद्र गुढा यांना स्‍थान देण्‍यात आले. मंत्रीमंडळात स्‍थान मिळाल्‍यानंतर गुढा हे पहिल्‍यांदा आपल्‍या विधानसभा मतदारसंघातील दौर्‍यावर आले. यावेळी त्‍यांच्‍या समर्थकांनी भव्‍य स्‍वागताचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्‍थांनी गावात चांगले रस्‍ते करा, अशी मागणी केली.

यावेळी गुढा म्‍हणाले की, आपल्‍या गावातील रस्‍ते हे अभिनेत्री हेमामालिनी यांच्‍या गालासारखे व्‍हावेत. अलिकडच्‍या काळातील अभिनेत्रींच्‍या नावे मला माहित नाहीत, असे गुढा यांनी सांगितले. यावर गर्दीतील समर्थकाने अभिनेत्री कॅटरीना कैफ ( Katrina Kaif : )  हिचे नाव घेतले. यावर मंत्री राजेंद्र गुढा हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या मुख्‍य अभियंत्‍यांना म्‍हणाले की, आपल्‍या गावांमधील रस्‍ते हे कॅटरीनाच्‍या गालांसारखे हवेत. या कार्यक्रमाचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला. यानंतर गुढा यांच्‍या वादग्रस्‍त विधानाची चर्चा सुरु झाली. या वेळी गुढा यांनी आपल्‍या मतदारसंघातील सर्व विकास कामे तत्‍काळ पूर्ण व्‍हावीत, असे आदेशही संबंधितांना दिले.

लालूप्रसाद यादव यांच्‍या वादग्रस्‍त विधानाची आठवण

यापूर्वी राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी रस्‍त्‍यांची तुलना अभिनेत्री हेमामालिनी यांच्‍या गालाशी केली होती. या वादग्रस्‍त विधानामुळे लालूप्रसाद यादव यांच्‍यावर टीकेची झोड उठली होती.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :

 

Back to top button