corona booster dose : देशात 'बुस्टर डोस'ची गरज नाही, AIIMS संचालक डॉ. गुलेरिया यांचा दावा | पुढारी

corona booster dose : देशात 'बुस्टर डोस'ची गरज नाही, AIIMS संचालक डॉ. गुलेरिया यांचा दावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : corona booster dose : देशवासियांना कोरोना लसीचा बुस्टर डोस आवश्यक नाही, असा दावा दिल्ली एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी केला आहे. देशात सध्या कोरोना संसर्गग्रस्तांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. कोरोना लसीचे डोस सध्या संरक्षण करण्यास समर्थ असल्याचे त्यावरून दिसून येत असल्याने बुस्टर डोसची आवश्यकता तुर्त दिवसागणिक कमी होत असल्याचे गुलेरिया यांनी स्पष्ट केले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) संचालक डॉ.बलराम भार्गव यांचे ‘गोईंग व्हायरल’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. निती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी देखील कार्यक्रमातून देशात बुस्टर डोस बाबत अद्याप संशोधनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

देशात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसरी लाटेची शक्यता कमी आहे. सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोना लस नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे अधोरिखित होत आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोनाचे स्वरूप हळूहळू बदलेल. कोरोना रूग्ण सापडत राहीतील, पंरतु त्यांची गंभीरता फार कमी राहील. सध्या अधिकाधिक नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस वेळेत घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला संरक्षण मिळण्यास मदत होईल. सध्या परिस्थिती आशादायक असली तरीही नगारिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ.गुलेरिया म्हणाले. (corona booster dose)

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतने वेग धरल्याने संसर्गाचा प्रसार देखील वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. लसीच्या प्रभावामुळेच संसर्गाचा वेग मंदावला आणि रूग्णालयांवरील दबाब कमी झाला. कोरोना महारोगराई येत्या काळात केवळ एक आजाराप्रमाणे राहील, असे डॉ.गुलेरिया म्हणाले. (corona booster dose)

Back to top button