नितीश कुमारांच्‍या ‘यू-टर्न’चे राहुल गांधींनी सांगितले कारण; म्‍हणाले…. | पुढारी

नितीश कुमारांच्‍या 'यू-टर्न'चे राहुल गांधींनी सांगितले कारण; म्‍हणाले....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील आठवड्यात अचानक बिहारच्‍या राजकारणात कमालीच्‍या वेगाने घडामोडी घडल्‍या. मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीशकुमारांनी राष्‍ट्रीय जनता दलासह काँग्रेस महाआघाडीची साथ सोडली. त्‍यांनी पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सत्ताग्रहण करत मुख्‍यमंत्रीपदाची शपथही घेतली. यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाष्‍य केले आहे. नितीश कुमारांनी इंडिया आघाडीचे साथ का सोडली, याचे कारणही त्‍यांनी सांगितले आहे. ( Rahul Gandhi says Nitish Kumar quit alliance due to Bihar caste survey )

राहुल गांधी यांची भारत जोडो न्‍याय यात्रा सध्‍या बिहारमध्‍ये आहे. यावेळी त्‍यांना नितीश कुमारांच्‍या इंडिया आघाडी सोडण्‍याच्‍या निर्णयाबाबत विचारले असता राहुल गांधी म्‍हणाले की, मी त्यांना ( नितीश कुमार) सरळ सांगितले  हाेते की, ‘तुम्हाला बिहारमध्ये जात जनगणना करावी लागेल’. काँग्रेससह राष्‍ट्रीय जनता दलाने नितीश कुमारांकडे जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला; पण भाजप घाबरले. त्‍यांनी याला विरोध केला. त्‍यामुळे नितीश कुमार यांना भाजपने त्यांना पळून जाण्यासाठी मागच्या दाराची सोय केली!.”  ( Rahul Gandhi says Nitish Kumar quit alliance due to Bihar caste survey )

सामाजिक न्‍यायासाठी आम्‍हाला नितीश कुमारांची गरज नाही

, “तुम्हाला सर्व सामाजिक न्याय देणे ही इंडिया आघाडीची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्हाला नितीश कुमारांची गरज नाही.”


हेही वाचा : 

 

 

Back to top button