Nitish Kumar Bihar : पुन्हा रालोआशी घरोबा…!; जाणून घ्या नितीशकुमारांच्या ‘यू टर्न’ राजकारणाचा इतिहास

Nitish Kumar
Nitish Kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा यू-टर्न घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील १७ महिन्यांचे महाआघाडीचे सरकार कोसळले. नितीश कुमार यांनी आता भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. Nitish Kumar Bihar

मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा हा चौथा यू-टर्न असेल. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी पुन्हा एकदा एनडीएसोबत जाण्याच्या निर्णय घेतला आहे. ते आता नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते सर्वाधिक काळ बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. त्यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. पण एक काळ असा होता की नितीश यांना राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तर जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास Nitish Kumar Bihar

बिहारमधील बख्तियारपूर जिल्ह्यात १ मार्च १९५१ रोजी जन्मलेल्या नितीश कुमार यांनी एनआयटी पाटणा येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावरच त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. १९७४ ते १९७७ पर्यंत नितीश कुमार जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशीही जोडले गेले होते. त्यानंतर त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला.

Nitish Kumar Bihar  नितीशकुमार यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा हरनौतमधून विधानसभा लढवली

१९७७ मध्ये नितीशकुमार यांनी हरनौत मतदारसंघातून बिहार विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, काँग्रेसच्या भोला प्रसाद सिंह यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत जनता पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या. तर ९७ जागांवर पराभव झाला होता. पहिला पराभव विसरून नितीशकुमार १९८० मध्ये हरनौतमधून पुन्हा जनता पक्षाच्या (सेक्युलर) तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र, यावेळीही त्यांचा पराभव झाला. भोला प्रसाद सिंह यांचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार अरुण कुमार सिंह यांनी त्यांचा पराभव केला.

या पराभवानंतर नितीशकुमार इतके नैराश्यात गेले होती की त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. विद्यापीठसोडून ७ वर्षे झाली होती. लग्न होऊनही बराच काळ लोटला होता. मात्र, त्याच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नव्हते. सलग दोन पराभवानंतर नितीशकुमार यांनी आपला जवळचा मित्रा मुन्ना सरकारसमोर काहीतरी व्यवसाय करावा लागेल, असे बोलून दाखविले होते. याबाबतचा उल्लेख पत्रकार संतोष सिंह यांच्या आपल्या 'Ruled and Misruled' या पुस्तकात केला आहे.

नितीशकुमार काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून विजयी झाले.

मात्र, त्यांनी व्यवसाय सुरू केला नाही. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. नितीश यांनी १९८५ च्या निवडणुकीत पत्नी मंजू यांच्याकडे शेवटची संधी मागितली. त्यांची पत्नी मंजू त्यावेळी सरकारी शाळेत शिक्षिका होत्या.१९८५ ची निवडणूक ही एक प्रकारे नितीशकुमार यांच्यासाठी शेवटची संधी होती. त्यामुळे त्यांनी आणि आणि त्याच्या मित्रांनी निवडणूक जिंकण्याची कोणतीही कसर सोडली नाही. निधी उभारण्यात आला. पत्नी मंजू यांनीही आपल्या बचतीतून २० हजार रुपये दिले. या निवडणुकीत नितीश पुन्हा लोकदलाच्या तिकिटावर हरनौतमधून निवडणूक लढले. आणि त्यांनी काँग्रेसच्या ब्रिजनंदन प्रसाद सिंह यांचा २१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

नितीश कुमार १९८५ मध्ये विधानसभेत पोहोचले. पण, त्यांचा पुढचा मुक्काम लोकसभा होता. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत बाढ मतदारसंघातून नितीशकुमार विजयी होऊन संसदेत पोहोचले. त्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी त्याच जागेवरून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९६ मध्ये तिसऱ्यांदा, १९९८ मध्ये चौथ्यांदा आणि १९९९ मध्ये पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली.

नितीशकुमार यांनी त्यांची शेवटची लोकसभा निवडणूक २००४ मध्ये लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी नालंदा आणि बाढ या दोन्ही जागांवरून निवडणूक लढवली होती. मात्र, ते बाढमधून पराभूत झाले आणि नालंदामधून विजयी झाले. त्यांचीही ही शेवटची निवडणूक होती. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही.

२००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

२००० मद्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये नितीशकुमार कृषीमंत्री होते. निवडणुकीनंतर, भाजपच्या पाठिंब्याने, नितीश यांनी ३ मार्च २००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, बहुमत नसल्याने त्यांना सात दिवसांत राजीनामा द्यावा लागला. नोव्हेंबर २००५ मध्ये नितीशकुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा भाजप-जेडीयू युतीकडे बहुमत होते. त्यानंतर नितीशकुमार विधान परिषदेवर गेले. मे २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यानचा काळ वगळला नोव्हेंबर २००५ पासून आतापर्यंत सतत बिहारचे मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. जीतनराम मांझी मे २०१४ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंत मुख्यमंत्री होते.

नितीशकुमार यांनी १९९५ मध्ये शेवटची विधानसभा आणि २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. २००६ पासून विधान परिषदेचे सदस्य आहेत. २०१८ मध्ये ते तिसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य झाले. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांना निवडणूक न लढवण्याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, मला एकाही जागेवर लक्ष केंद्रित करायचे नाही.

Nitish Kumar Bihar  : मुख्यमंत्री असताना नितीशकुमार यांचा यू-टर्न

२०१३ मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवल्यावर नितीशकुमार यांनी एनडीएसोबतची युती तोडली होती. त्यांनी राजदसोबत सरकार स्थापन केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा पराभव झाल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.

नितीश यांनी २०१५ ची निवडणूक आरजेडीसोबत लढवली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. पण २०१७ मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. नितीशकुमार यांनी २६ जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि युतीही तोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एनडीएसोबत सरकार स्थापन केले.

२०२२ मध्ये नितीशकुमार यांची भाजपसोबत मतभेद झाले. हे मतभेद इतके टोकाला गेले की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी भाजपची साथ सोडली. आणि राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी युती करून सरकार स्थापन केले. त्यानंतर नितीशकुमार यांनी रविवारी (दि.२८) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news