पुढारी ऑनलाईन डेस्क : काल (दि.२३) अयोध्येत पीएम मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जल्लोष आणि उत्साहाचे वातारण होते. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सूर्योदय योजने'ची घोषणा केली. (PM Modi launched Suryodaya Yojana)
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर पीएम मोदी यांनी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या अंतर्गत आता भारत सरकार १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची 'हर घर सोलार' असे उद्दिष्ट असल्याचे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (PM Modi launched Suryodaya Yojana)
या योजनेविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखी ट्विट करत या योजनेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अयोध्येहून परतल्यानंतर मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सूर्यवंशी प्रभू श्री रामाच्या प्रकाशातून सर्व भक्तांना ऊर्जा देणारी दूरदर्शी योजना घोषित केली. "प्रधानमंत्री सूर्योदय योजने'मुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होऊन ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असे देखील स्पष्ट केले आहे. (PM Modi launched Suryodaya Yojana)