Ram Mandir-Anushka Sharma : व्हायरल झालेल्या फोटोत अनुष्का? काय म्हणतात नेटकरी…

Ram Mandir-Anushka Sharma
Ram Mandir-Anushka Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दोघांना मिळाले होते. मात्र, दोघेही पोहोचले नसल्याने चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे अनुष्का अयोध्येला गेले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अनुष्का तिच्या प्रेग्नेंसीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नसल्याचा कयास बांधला जात आहे. (Ram Mandir-Anushka Sharma )

संबंधित बातम्या 

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला राजकिय नेत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी असल्याने जॉर्डनमधून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्याने या सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याने दिलगिरी व्यक्त केली होती. याचदरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील का उपस्थित राहू शकली नाही? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान अयोध्या राम मंदिराच्या सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक महिला डोळ्यावर चष्मा घालून बसलेली दिसत आहे. या फोटोत त्या महिलेच्या डोक्याचा अर्धाच भाग दिसतोय. बॅरिकेडेटस् आडवे असल्याने या महिलेचा संपूर्ण चेहरा दिसत नाही. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनुष्का या सोहळ्याला उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

तर काही नेटकऱ्यांना ही महिला नीता अंबानी किंवा दुसरी कोण तरी स्टार्स म्हणजे, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहू सकली नसल्याचा कयास बांधला जात आहे. (Ram Mandir-Anushka Sharma )

दुसरीकडे भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत विराट खेळणार नसल्याचे जाहिर झाले आहे. यामुळे तो आपला वेळ अनुष्का देत अलसल्याचेही बोलले जात आहे. यावरून अनुष्का प्रेंग्नट असून विराट तिची काळजी घेत असल्याचेही म्हटलं गेलं आहे. मात्र, खरोखरचं अनुष्का प्रेंग्नट आहे की नाही? किंवा प्रेग्नेंसीमुळे अनुष्का राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आली नाही? याची अध्याप माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news