Balasaheb Thackeray Birth Anniversary:’बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी’- सुप्रिया सुळेंकडून स्व. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन | पुढारी

Balasaheb Thackeray Birth Anniversary:'बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी'- सुप्रिया सुळेंकडून स्व. बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९८वी जयंती. या निमित्त शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ठाकरे यांना अभिवादन केले आहे. सुळे यांनी एक्स पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती… राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला.अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

हेही वाचा:

Back to top button