Kamal Haasan : अभिनेता कमल हसन कोरोना पॉझिटिव्‍ह | पुढारी

Kamal Haasan : अभिनेता कमल हसन कोरोना पॉझिटिव्‍ह

चेन्‍नई : पुढारी वृत्तसेवा

ज्‍येष्‍ठ अभिनेते कमल हसन (  Kamal Haasan ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीचे ते अमेरिकेवरुन भारतात परतले आहेत. कोरानाची लागण झाल्‍याची माहिती त्‍यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून चाहत्‍यांना दिली.

‘कोरोना महामारी अद्‍याप संपलेली नाही’

कमल हसन (  Kamal Haasan ) यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी नुकताच अमेरिकेतून भारतात परतलो. मला थोडा खोकला येत होता. मी चाचणी केली. यामध्‍ये मला कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. मी रुग्‍णालयात दाखल झालो आहे. कोरोना महामारी अद्‍याप संपलेली नाही, हे सर्वांनी लक्षात घ्‍यावे, सर्वांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. कमल हसन यांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने कृषी कायदे रद्‍द करण्‍याच्‍या निर्णयाचे कमल हसन यांनी स्‍वागत केले होते. अखेर देशातील शेतकर्‍यांचा विजय झाला, असे त्‍यांनी म्‍हटले होते. कमल हसन यांच्‍या मक्‍कल निधि मय्‍यम या राजकीय पक्षानेही कृषी कायदाचा तीव्र विरोध केला होता.

हेही वाचलं का?

Back to top button