Alcohol seized : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर 38 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त | पुढारी

Alcohol seized : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर 38 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा

औषधांच्या बॉक्सबरोबर लपवून नेला जाणारा सुमारे 38 लाख रुपयांचा विदेशी मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. (Alcohol seized) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांनी स्वतः केवळ एका कर्मचाऱ्यासोबत सापळा रचून ही धडक कारवाई केली.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रातून गुजरातकडे मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवून सिमाभागात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. (Alcohol seized)

त्याअंतर्गत अधीक्षक युवराज राठोड यांना या अवैध मद्याच्या वाहतूकीबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यांनी अक्कलकुवा तालुक्यात खापरजवळ असणाऱ्या कोराई शिवारातील महादेव ढाबा परिसरात, सापळा रचला. (डीडी ०१ ए ९५१९ ) क्रमांकाची आयशर गाडीची पाहणी केली. यावेळी चालक राम स्वरुप बिश्नोई याने, औषधाचे खोके दाखवून औषधांची बिले आणि कागदपत्रे सादर केली.

Alcohol seized : औषधांच्या बॉक्समध्‍ये लपवला मद्यसाठा

अधीक्षक राठोड यांनी कसून तपासणी केली. औषधांच्या बॉक्सबरोबरच २३७२ बल्क लिटर विदेशी मद्य आणि ५८८ बल्क लिटर बियरचा गोवा बनावटीचा मद्यसाठा लपवलेला आढळून आला. (Alcohol seized) हा साठा सुमारे ३८ लाख २८ हजार रूपयांचा असल्याची माहिती राठोड यांनी यावेळी दिली. पहाटेपर्यंत ही कारवाई करून चालकास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button