Ram Mandir Inauguration : रामलल्लांसाठी हिर्‍यांचा हार; ४० कारागिरांचे योगदान

Ram Mandir Inauguration : रामलल्लांसाठी हिर्‍यांचा हार; ४० कारागिरांचे योगदान

पाच हजार अमेरिकन हिर्‍याचा वापर करून रामलल्लांसाठी हिर्‍याचा हार तयार करण्यात आला आहे. यामध्ये चांदीचाही वापर करण्यात आला आहे. ४० कारागिरांनी ३५ दिवसांत हा हार तयार केला आहे. हिर्‍याच्या हारात राम मंदिराची प्रतिकृती दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

नागपूरमधील बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी स्वीट डिश बनविण्याचा निर्धार केला आहे. 'राम हलवा' या नावाने ते गोड पदार्थांची डिश बनविणार आहेत. हा गोड प्रसाद ७ हजार किलोंचा असणार आहे. अयोध्येतील भक्तांना हा प्रसाद ते वाटणार आहेत.

सोन्याच्या पादुका

हैदराबादस्थित छल्ला श्रीनिवास शास्त्री (वय ६४) यांनी हैदराबाद येथून पायी चालत जाऊन प्रभू श्रीरामासाठी अनोखी देणगी दिली आहे. त्यांनी सोन्याच्या मुलाम्यातील पादुका राम मंदिर ट्रस्टला दान केल्या आहेत.

मथुरेतील यज्ञांसाठी २०० किलो लाडू पाठविण्यात येणार आहेत. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेच्यावतीने हे लाडू पाठविण्यात येणार आहेत. तिरूपती देवस्थानच्या वतीने १ लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत. सीता मातेसाठी सुरतहून खास साड्या पाठविण्यात येणार आहेत. या साडीवर प्रभू श्रीराम आणि अयोध्येची छबी असणार आहे. मध्य प्रदेशातूनही ५ लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत.

१८ दरवाजांवर १०० किलो सोन्याचा मुलामा

अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेले १८ दरवाजे बसविण्यात येणार आहेत. यातील १८ दरवाजांना दिल्लीतील कारागिरांनी १०० किलो सोन्याचा मुलामा दिला आहे. सोन्याचा दरवाजा १२ फूट उंच आणि ८ फूट रुंद असणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news