भेटीसाठी धार्मिक पुस्‍तके ते राज्‍यनिहाय भाेजन व्‍यवस्‍था ; जाणून घ्‍या अयोध्‍या नगरीतील तयारी | पुढारी

भेटीसाठी धार्मिक पुस्‍तके ते राज्‍यनिहाय भाेजन व्‍यवस्‍था ; जाणून घ्‍या अयोध्‍या नगरीतील तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला आहे. देशातील सर्वात मोठा सण दिवाळीसारखीच तयारी उत्तर प्रदेशमध्‍ये सुरु आहे. २२ जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी जनतेमध्‍ये प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) जाणून घेवूया अयोध्‍येत राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यासाठी सुरु असणार्‍या तयारीविषयी…

गीता प्रेसमधून अयोध्येला १० हजारांहून अधिक धार्मिक पुस्‍तके रवाना

 राम मंदिर प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी येणाऱ्या पाहुणे आणि भाविकांना भेट म्हणून गीता प्रेसमधून प्रकाशित झालेली १० हजारांहून अधिक पुस्‍तके शुक्रवारी (दि.१२) अयोध्येकडे रवाना झाली. या पुस्‍तकांचे भाविकांना प्रसादासह भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. अयोध्या दर्शन, १९७२ मध्ये प्रकाशित झालेल्या कल्याणच्या श्री रमांक विशेषांकाची सुधारित आवृत्ती, अयोध्या महात्म्य आणि गीता डायरी यांचा समावेश आहे. आर्ट पेपरवर प्रकाशित झालेल्या श्री रामचरितमानसच्या प्रती १२ विशेष अतिथींनाही पाठवण्यात आल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony)

एकाचवेळी १० हजार इडल्‍या बनवणारे मशीन

हजारो पाहुणे व भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. एकावेळी दहा हजार इडल्या बनवणारे मशीन दिल्लीहून आणले जात आहे. हे यंत्र १५ जानेवारीपर्यंत अयोध्येत पोहोचेल. कन्नौजमधून बटाटे, छत्तीसगडमधून तांदूळ, आसाममधून चहाची पाने आणि आले, अमेठीतून मसाले, बुलंदशहरमधून साखर आणि राजस्थानमधून तूप यासह मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची अयोध्‍या शहरात आवक होत आहे. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony)

Ayodhya Ram Mandir : राज्‍यनिहाय भाेजन व्‍यवस्‍था

अयोध्‍या तीर्थक्षेत्र पुरममध्ये संत आणि अति महत्त्‍वाच्‍या व्‍यक्‍तींसाठी (व्‍हीआयपी) भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे सहा उपनगरे बांधण्यात आली आहेत. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी रेस्टॉरंट्स बनवली आहेत. बाग बिजेसी गावात पंजाबी रेस्टॉरंट असेल. इतर शहरांमध्ये तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील भाविकांसाठी लंगरची व्यवस्था केली जाईल. त्याचबरोबर विविध ठिकाणी उपाहारगृहेही चालवली जाणार आहेत. उदासीन आश्रमासमोर असलेले रेस्टॉरंट इस्कॉन मंदिर चालवणार आहे. अक्षय पत्र फाऊंडेशनने एका रेस्टॉरंटची जबाबदारीही घेतली आहे. दक्षिण भारतातील अम्मा जी रसोई हे रेस्टॉरंटही चालवणार आहेत.

Ayodhya Ram Mandir : साधूंसाठी विशेष व्‍यवस्‍था

राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यात साधूंसाठी विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्यांच्यासाठी फळांव्यतिरिक्त गव्हाच्या पिठाच्या पुरी, साबुदाणा आणि शेंगदाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गव्हाच्या पिठाची पुरी, चार प्रकारच्या भाज्या, रोटी, बासमती तांदूळ, गोविंद भोग भात, कचोरी, डाळ, पापड, खीर आणि सुमारे १० प्रकारच्या मिठाई असतील. न्याहारीसाठी दही जिलेबी, मूग डाळ आणि गाजराचा हलवा, चहा, कॉफी आणि चार-पाच प्रकारचे भजी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये काय वाढवता येईल किंवा कमी करता येईल यावरही चर्चा सुरू आहे.

हनुमानगढी आणि नागेश्वरनाथ येथे २५ इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे

Ram Mandir Inauguration

हनुमानगढी आणि नागेश्वरनाथ मंदिरात २५ इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आता हेच कॅमेरे कनक भवन, राम की पायडी आणि इतर ठिकाणीही बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे इंटरनेट किंवा लोकल एरिया नेटवर्क (LAN) वर फुटेज पाठवून आणि प्राप्त करून डिजिटल व्हिडिओचे निरीक्षण करतात. ते WiFi किंवा पॉवर ओव्हर इथरनेट (PoE) केबलद्वारे नेटवर्कशी कनेक्ट होतात.

अयोध्‍या नगरीवर असणार १० हजार ५४८ कॅमेर्‍यांची नजर

यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांव्यतिरिक्त, ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ अंतर्गत अयोध्येत आतापर्यंत १०,५४८ इंटेलिजन्स कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये रामनगरीच्या सुमारे 3500 कॅमेऱ्यांचा समावेश आहे. अयोध्या कोतवाली परिसरात सुमारे 2,000, रामजन्मभूमी पोलिस स्टेशन परिसरात सुमारे 1,500 आणि शहर कोतवाली परिसरात 710 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अयोध्येत 10,548 ठिकाणी इंटेलिजन्स कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button