Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी गोळ्या झेललेल्या संतोष दुबेंचे स्वप्न पूर्ण | पुढारी

Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी गोळ्या झेललेल्या संतोष दुबेंचे स्वप्न पूर्ण

अयोध्या; वृत्तसंस्था : राम मंदिरासाठी हौतात्म्य पत्करलेल्या कारसेवकांच्या आठवणी अद्यापही ताज्या असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ कारसेवक संतोष दुबे (Karsevak Santosh Dubey) यांनी दिली. कारसेवेसाठी दुबे यांनी 5 हजार कारसेवकांना एकत्र केले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अनेक कारसेवकांना प्राणास मुकावे लागले होते. (Ram Mandir Inauguration)

संबंधित बातम्या : 

दुबे (Karsevak Santosh Dubey) यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात पाच गोळ्या झेलल्या होत्या. 20 दिवस ते कोमात होते. त्यानंतर त्यांना शुद्ध आली होती. त्यांच्या हातावर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. साक्षात मृत्यूवरच त्यांनी मात केली होती. बाबरी पतनामध्ये कारसेवकांचा सहभाग होता. संघर्षानंतर अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. याचा अतीव आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा देताना, हौतात्म्य पत्करलेल्या कारसेवकांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले होते. आजही दुबे जुन्याच घराच वास्तव्य करीत आहेत. राम मंदिर झाल्याशिवाय घर बांधणार नसल्याची शपथ त्यांनी घेतली होती. प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर आपले घरही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Ram Mandir Inauguration)

हेही वाचा : 

Back to top button