Ram Mandir Inauguration : राजीव गांधी यांची मध्यस्थी आणि अयोध्येतील शिलान्यास | पुढारी

Ram Mandir Inauguration : राजीव गांधी यांची मध्यस्थी आणि अयोध्येतील शिलान्यास

प्रभू राम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Inauguration) सोहळ्यावरून अयोध्या नगरी भारतासह जगात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. 1990 च्या दशकामध्येही अयोध्या चर्चेचा केंद्रबिंदू होता. मात्र, तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. अयोध्येतील राम मंदिर वर्तमानात वास्तव बनले आहे. अयोध्येतील राम मंदिरामागे शेकडो वर्षांचा इतिहास आहे. अयोध्येतील राम मंदिर साकारण्यामागे भूतकाळातील अनेक घटना यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

  • राम मंदिर आंदोलनाच्या आधी हिंदू जागरण मंचाच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते विनय कटियार मंदिर आणि मठातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवत होते.
  • अयोध्या प्रकरणात 1984 साली विनय कटियार यांची एंट्री झाली. त्यावेळी कटियार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक होते. संघाने त्यांच्यावर बजरंग दलाची धुरा सोपविली होती.
  • 1984 सालीच बजरंग दलाची स्थापना झाली होती. संघ आणि विश्व हिंदू परिषदेने यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. कटियार याचे अध्यक्ष होते.
  • 1984 साली काँग्रेस मजबूत स्थितीत होता. त्या काळी संघावर दोन वेळा बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे संघावर मर्यादा होत्या.
  • 1984 साली कानपूर येथील फूलबाग याठिकाणी कटियार यांनी राम मंदिरप्रकरणी कार्यक्रम आयोजित केला होता.
  • या सभेत संघाचे अशोक सिंघल यांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी सिंघल यांनी कटियार यांना राम मंदिरावर फोकस करण्याचा सल्ला दिला.
    बंदीच्या भीतीने संघावर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे बजरंग दलाच्या माध्यमातून कटियार यांनी अयोध्येतील बाबरी मशिद आणि राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला.
  • 1986 सालानंतर कटियार राम मंदिर आंदोलनाच्या शीर्षस्थानी आले होते. त्यांनी आंदोलनाला धार चढविण्यास सुरुवात केली. फायरब्रँड नेते म्हणून कटियार ओळखले जाऊ लागले.
  • 1989 साली बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने शिलान्यासाची घोषणा केली होती. त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी होते, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी एन. डी. तिवारी होते.
  • शिलान्यासावरून वातावरण तापल्यामुळे राजीव गांधी यांनी तत्कालीन गृहमंत्री बुटासिंग यांना समझोत्यासाठी अयोध्येला पाठविले होते.
  • मुख्यमंत्री तिवारी यांच्यासमवेत गुप्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीस कटियार आणि सिंघल यांना बोलावले होते.या बैठकीत वादग्रस्त जागेपासून 20 फुटांवर शिलान्यास करण्यास सहमती देण्यात आली होती. कामेश्वर चौपाल यांनी त्यानुसार शिलान्यासाच्या ठिकाणी वीट रचली होती.
  • 30 ऑक्टोबर 1990 रोजी अयोध्येत कारसेवकांच्या आंदोलनात गोळीबार करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या गोळीबारात 6 कारसेवकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. चेंगराचेंगरीतही काही कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
    या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. ‘मंदिर वही बनाएंगे’ आणि ‘एक धक्का और दो, बाबरी तोड दो’ या दोन घोषणा देऊन राम मंदिरासाठी हिंदुत्ववाद्यांनी भीष्मप्रतिज्ञा केली होती.
  • 5 डिसेंबर 1992 रोजी म्हणजे बाबरी पतनाच्या आधी एक दिवस, फैजाबाद येथील कटियार यांच्या निवासस्थानी हिंदुत्ववादी संघटनांची गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येते.
  • 6 डिसेंबर रोजी बाबरीच्या पतनानंतर कटियार यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले होते. त्यावेळी भडकावू भाषणासंदर्भातील कागदपत्रे सापडली होती.
  • ऑक्टोबर 1992 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी राम मंदिरासाठी जमीन संपादित करण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्याचवेळी कटियार यांनी कारसेवेची घोषणा केली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button