अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या (Ram Temple inauguration) पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांसाठी लक्ष्मणरेषा, अर्थात काही अटी घातल्या आहेत. मंदिरात इलेक्ट्रॉनिक गॅजेटसह अन्य वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
संबंधित बातम्या :
22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा (Ram Temple inauguration) असून, अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मोबाईल, इअर फोन, गॅजेट, रिमोटची चावी मंदिरात नेता येणार नाही. सुमारे 7 हजारांहून अधिक जणांना निमंत्रित केले आहे. संत, धर्माचार्य आदींचाही यामध्ये समावेश आहे. संत-महंत यांना छत्र, चवर, ठाकूरजी, सिंहासन, गुरू पादुका मंदिरात आणण्यास मनाई घालण्यात आली आहे. आचार्यांचे शिष्य आणि सेवक यांना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. 11 वाजण्याआधी सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे लागणार आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
हेही वाचा :