तीन दिवसांत Lakshadweepसाठी तब्बल ७००० हजारांहून अधिक लोकांचे बुकिंग | पुढारी

तीन दिवसांत Lakshadweepसाठी तब्बल ७००० हजारांहून अधिक लोकांचे बुकिंग

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर हा केंद्रशासित प्रदेश पर्यटनासाठी चर्चेत आला आहे. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनने (एआयटीटीओए) दिलेल्‍या माहितीनुसार, लक्षद्वीपसाठी बुकिंगसाठी गेल्या तीन दिवसांत त्यांना आतापर्यंत आलेल्या कॉलपेक्षा सर्वात जास्त कॉल आले आहेत.

‘एआयटीटीओए’च्या अंदाजानुसार, गेल्या तीन दिवसांत पुढील तीन महिन्यांमध्ये लक्षद्वीपला जाण्यासाठी अनेकांनी बुकिंग केले आहे. लक्षद्वीपच्या पर्यटन आणि क्रीडा विभागानेही आपल्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी तयारी सुरू केली आहे. लक्षद्वीपकडे आतापर्यंत फक्त एक केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख होती. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांची वर्दळ फार नव्हती; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप चर्चेत आले. या भागाला आता थेट देशातील प्रमुख राज्यांशी जोडले जावेय त्यामुळे तेथील पर्य टनाला चालना मिळेल, अशी मागणीही ‘एआयटीटीओए’ने केली आहे.

लक्षद्वीपबाबत माहिती घेण्यासाठी विक्रमी कॉलची संख्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये लक्षद्वीप अव्वल स्थानावर आहे. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनचे सचिव अजय भल्ला म्हणाले की, मोदींच्या दौऱ्यानंतर गेल्या तीन दिवसांत त्यांना लक्षद्वीपच्या बुकिंग संदर्भात सर्वाधिक कॉल येत आहेत. भल्ला सांगतात की, लक्षद्वीपबद्दलची शेकडो माहिती त्यांच्या संस्थेशी संबंधित देशाच्या विविध भागांतून संबंधित टूर ऑपरेटरकडून दररोज मिळत आहे. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, लक्षद्वीपशी संबंधित लोकांना गेल्या तीन दिवसांत आलेल्या कॉलची संख्या आजपर्यंतची विक्रमी संख्या आहे.

तीन दिवसांमध्‍ये देशभरातून 7000 हून अधिक बुकिंग

भल्ला यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेशी संबंधित टूर ऑपरेटर्सना फक्त लक्षद्वीपसाठी देशभरातून 7000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये लक्षद्वीप अव्वल स्थानावर आहे. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनचे सचिव अजय भल्ला सांगतात की, मोदींच्या दौऱ्यानंतर गेल्या तीन दिवसांत त्यांना लक्षद्वीपच्या संदर्भात सर्वाधिक कॉल येत आहेत. लक्षद्वीपबद्दलची माहिती त्यांच्या संस्थेशी संबंधित देशाच्या विविध भागांतून संबंधित टूर ऑपरेटरकडून दररोज मिळत आहे. ऑल इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार,  गेल्या तीन दिवसांत लक्षद्वीपसाठी देशभरातून 7000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.

पीएम मोदींमुळे पर्यटन स्थळाच्या सुविधांमध्ये वाढ होईल

इंडिया टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटर असोसिएशनच्या मते, लक्षद्वीपला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वात योग्य मानले जातात. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा झाल्यामुळे आता लक्षद्वीपमधील पर्यटन स्थळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे; पण लक्षद्वीपमधील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे त्या सुविधा अजूनही तेथे नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप आणि येथील पर्यटनाबाबत ज्या प्रकारे आवाहन केले आहे, त्यामुळे येथील सुविधांमध्ये नक्कीच वाढ होईल आणि कोणत्याही परिस्थितीत पर्यटन वाढेल, असे देखील ‘एआयटीटीओए’कडून सांगण्यात आले आहे.

कोची येथून लक्षद्वीपसाठी थेट विमानसेवा

इंडिया ट्रॅव्हल मार्टचे जतीन साहनी यांनी याबाबत सांगितले की, सध्या केरळमधील कोची येथून लक्षद्वीपसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना द्यायची असेल, तर देशाच्या विविध राज्यांतून, विशेषत: राजधानी किंवा देशाच्या इतर मोठ्या शहरांतून थेट विमानसेवा व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. जेणेकरून लोकांना त्यांच्या सोयीनुसार थेट तिथे पोहोचता येईल.

हेही वाचा :

 

Back to top button