ISRO Aditya L1 Mission: इस्रो इतिहास रचणार? आदित्य-L1 आज हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार | पुढारी

ISRO Aditya L1 Mission: इस्रो इतिहास रचणार? आदित्य-L1 आज हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क: ISRO भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी आज (दि.६) महत्त्वाचा दिवस आहे. कारण भारताचे सूर्ययान आदित्य-L1 आज हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करणार आहे. आज दुपारी ४ वाजता आदित्य एल-१ ला फायनल हॅलोजन कक्षेत पाठवण्यासाठी फायर केले जाणार आहे, ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास, भारतीय अवकाश संशोधन संस्था अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचणार आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (ISRO Aditya L1 Mission)

भारताचे सूर्ययान आदित्य-L1 चा प्रवास 2 सप्टेंबर 2023 रोजी PSLV-C57 च्या प्रक्षेपणाने सुरू झाला. यानंतर आज 110 दिवसांच्या संक्रमणानंतर हे अंतराळयान आता प्रभामंडलच्या अंतिम कक्षेत प्रवेश करण्यास सज्ज आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असलेल्या फायनल हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य-L1 प्रवेश करणार असून, यानंतर ते पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर स्थिर असलेल्या ‘लॅगरेंज पॉईंट१’ वर पोहचणार आहे. सौर वातावरणाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. (ISRO Aditya L1 Mission)

ISRO Aditya-L1 Mission Updates : काय आहे मोहिम ‘आदित्य-L1’ मोहिम

भारताचे सूर्यमोहिम अंतराळयान ‘आदित्य L1’ या मोहिमेचे प्रक्षेपण २ सप्टेंबर रोजी झाले. या मोहिमेत हे यान सुमारे १५ लाख किलोमीटर अंतर कापणार आहे. प्रक्षेपणानंतर १२५ दिवसांत यान सूर्याच्या सर्वात जवळच्या ‘लॅगरेंज पॉईंट L1’ बिंदूवर पोहोचेल. त्यानंतर याठिकाणी हे स्पेसक्राफ्ट स्थिरावणार आहे. तसेच पुढे ‘आदित्य L1’ अंतराळयान सूर्याची छायाचित्रे घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल. दरम्यान सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेला लिंग्रज पॉईंट एल-१ हा या मोहिमेतील अंतिम टप्पा आहे.

‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षे

‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. ‘चांद्रयान-3’प्रमाणेच ‘आदित्य एल-1’ सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून ‘एल-1’ पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

सूर्यमोहिमेतून अनेक रहस्ये उलगडणार

या मोहिमेच्या माध्यमातून ‘इस्रो’ सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे ‘इस्रो’ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास ‘आदित्य एल-1’ करणार आहे. याशिवाय सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल देखील माहिती मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button