Aditya L1 : आदित्य L1 ने घेतला पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी! इस्रोने शेअर केला व्हिडिओ

Aditya L1 Selfie with Earth & Moon
Aditya L1 Selfie with Earth & Moon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Aditya L1 : भारताने सूर्य मोहिमेअंतर्गत आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर पृथ्वीभोवतीच्या दोन कक्षा आदित्य L1 ने यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत. त्याचा पुढचा प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान आदित्य L1 ने पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतले आहे. इस्रोने कॅपशनसह X वर (पूर्वीचे ट्विटर) याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इस्रोने म्हटले आहे. आदित्य L1 (Aditya L1) चा प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान आदित्य L1 च्या बोर्डवर बसवलेले कॅमेरा VELC & SUIT (Payload- Camera) ने पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. आदित्यने 4 सप्टेंबर रोजी ही छायाचित्रे टिपली आहे. हे जणू असे वाटत आहे की, आदित्य सूर्याच्या दिशेने L1 बिंदूकडे निघाला आहे. जाता-जाता त्याच्या नजरेस (कॅमेरा) पडणाऱ्या पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतले आहे, असे इस्रोने मिश्किलपणे म्हटले आहे.

Aditya L1चा व्हिडिओ इस्रोने X वर शेअर केला आहे. पाहा व्हिडिओ…

इस्रोने व्हिडिओत म्हटले आहे की, आदित्य L1 च्या बोर्डवर बसवलेल्या VELC & SUIT (Payload- Camera) या दोन कॅमेऱ्यांनी (छायाचित्र उपकरणांनी) स्वतःचा सेल्फी घेतला. सोबत पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या प्रतिमासुद्धा त्यात टिपल्या गेल्या आहेत. या प्रतिमेत पृथ्वी एका विशाल निळ्या गोलासारखी दिसत आहे. तर चंद्र एक लहानशा कणासारखा भासत आहे.

इस्रोने व्हिडिओत म्हटले आहे की, आदित्य L1 च्या बोर्डवर बसवलेल्या VELC & SUIT (Payload- Camera & Telescope) या दोन कॅमेरा आणि दुर्बिणीने (छायाचित्र उपकरणांनी) स्वतःचा सेल्फी घेतला. व्हिडिओत VELC & SUIT स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी पृथ्वी आणि चंद्र हे दोन्हीही त्यात टिपले गेले आहेत. या प्रतिमेत पृथ्वी एका विशाल निळ्या गोलासारखी दिसत आहे. तर चंद्र एक लहानशा कणासारखा भासत आहे.

The Visible Emission Line Coronagraph (VELC) म्हणजेच दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ हे उपकरण आदित्य च्या बोर्डवर बसवण्यात आले आहे. हे उपकरण एक प्रकारचा कॅमेरा आहे जो सूर्याचा कोरोना आणि कोरोनल मास इजेक्शनच्या गतिशीलतेचा अभ्यास करेल. विशेष म्हणजे सौर कोरोनाची प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाइन केलेले VELC उपकरण हे बेंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

Solar Ultraviolet Imaging Telescope (SUIT) सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप हे आदित्य L1 यानाच्या बोर्डवर बसवलेले दुसरे एक उपकरण आहे. हे उपकरण म्हणजे एक प्रकारची अंतराळ दुर्बिण आहे. जी जवळच्या अल्ट्रा-व्हायोलेट (UV) मध्ये सौर फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरची प्रतिमा घेऊ शकते आणि जवळच्या UV मध्ये सौर विकिरण भिन्नता मोजू शकते. हे उपकरण पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ने विकसित केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news