Kejriwal Wish to Sisodia: ‘ये दोस्ती…’ मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडून तुरूंगातील सिसोदिया यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

Kejriwal Wish to Sisodia
Kejriwal Wish to Sisodia

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया हे गेल्या ११ महिन्यांपासून दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तुरूंगात आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज (दि.५) मनीष सिसोदिया यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातील त्यांचा दोस्त मनीष  यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांसोबतचा जुना फोटो आणि संदेश त्यांच्या 'X' अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Kejriwal Wish to Sisodia)

Kejriwal Wish to Sisodia: विश्वास, आपुलकी, मैत्री तुटणार नाही- केजरीवाल

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ही मैत्री खूप जुनी आहे. आमचा स्नेह आणि विश्वास खूप मजबूत आहे. जनतेसाठी काम करण्याची ही आवडही खूप जुनी आहे. षड्यंत्रकर्त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी. हा विश्वास, ही आपुलकी आणि ही मैत्री कधीही तुटणार नाही", असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातील सिसोदीया यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Kejriwal Wish to Sisodia)

हुकूमशाहीच्या युगात मनीषचे धैर्य सर्वांना प्रेरणा देते

खोटे गुन्हे दाखल करून भाजपने गेल्या 11 महिन्यांपासून मनीषला तुरुंगात डांबले आहे. पण मनीष त्यांच्या दडपशाहीसमोर खंबीरपणे उभा आहे, त्यांच्या हुकूमशाहीपुढे आजपर्यंत झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही. हुकूमशाहीच्या या युगात मनीषचे धैर्य आपल्या सर्वांना प्रेरणा देते. (Kejriwal Wish to Sisodia)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news