मनीष सिसोदीया यांच्या ईडी कोठडीत वाढ, जामीन अर्जावर १२ एप्रिलला सुनावणी | पुढारी

मनीष सिसोदीया यांच्या ईडी कोठडीत वाढ, जामीन अर्जावर १२ एप्रिलला सुनावणी

पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली मद्य घोटाळा मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यात त्याची न्यायालयीन कोठडी आज (दि.०५) संपली. त्यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर सिसोदीया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करतेवेळी दिल्ली कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ एप्रिलपर्यंत वाढ केली. त्यांच्या जामीन अर्जावर १२ एप्रिलला नियमित सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे.

मनीष सिसोदिया यांच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सिसोदीया यांची सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या मद्य धोरण प्रकरणातील सीबीआय न्यायालयीन कोठडी १७ एप्रिल २०२३ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सिसोदिया यांना न्यायालयाकडून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.

हेही वाचा:

Back to top button