Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल ईडीचा समन्स चुकवत १० दिवसांच्या विपश्यनेला जाणार

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालयाने (ईडी) २१ डिसेंबर रोजी समन्स चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मात्र, केजरीवाल ईडीचा समन्स चुकवत १० दिवसांच्या विश्यपना शिबिरास जाणार आहेत. केजरीवाल विश्यपना शिबिरासाठी कोणत्या शहरात जातील? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ते विश्यपनेसाठी मंगळवारीच रवाना होणार होते. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी आपली नियोजित विश्यपना एक दिवस पुढे ढकलली.

ईडीने सोमवारी (दि.२०) त्यांना समन्स बजावला होता. दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत केजरीवाल यांच्या वकिलांनी ईडीच्या नोटीसबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बहुधा ते गुरुवारी ईडीसमोर हजर राहून आपली बाजू मांडतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलांचे मत घेतल्यानंतरच केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्याऐवजी विपश्यनेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी वकिलांना पुन्हा ईडीच्या समन्समध्ये काही त्रुटी आढळल्या असून ते गुरुवारी याबाबत भाष्य करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाने म्हटले होते की, पक्षाचे वकील समन्सचा अभ्यास करत आहेत आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य ती पावले उचलली जातील. याशिवाय केजरीवाल यांचा विपश्यनेचा कार्यक्रम आधीच ठरलेला होता आणि ही माहिती सार्वजनिक असल्याचे आप नेत्यांनी सांगितले होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news