नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज (ईडी) सक्तवसुली संचालनालयाने मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार नसल्याचे पत्र ईडीला पाठवले आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी समन्सला हजर राहण्याचे पुन्हा एकदा टाळले आहे. यामुळे दिल्लीतले राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज 3 जानेवारीला ईडीसमोरील चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. ईडीने मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी तब्बल तिसरी नोटीस बजावली आहे.
"ईडीच्या तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत, पण इडीची नोटीस बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांना निवडणूक प्रचारापासून रोखायचे असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.