‘आम्‍ही भिक्षा मागितली नव्‍हती’ : काँग्रेसचा ‘तृणमूल’वर हल्‍लाबाेल

ममता बॅनर्जी आणि अधीर रंजन चौधरी ( संग्रहित छायाचित्र )
ममता बॅनर्जी आणि अधीर रंजन चौधरी ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्‍ही भिक्षा मागितली नव्‍हती. ममता बॅनर्जींनी स्‍वत:ला आघाडी हवी असल्‍याचे सांगितले होते. आम्‍हाला ममता बॅनर्जी यांच्या दयेची गरज नाही. आम्‍ही स्‍वबळावर निवडणूक लढवू शकतो. त्‍यांना आमच्‍याशी आघाडी नको आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पश्‍चिम बंगालमधील काँग्रेसचे ( West Bengal Congress) नेते अधीर रंजन चौधरी ( Adhir Ranjan Chowdhury ) यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्‍यावर तोफ डागली. अधीर रंजन चौधरी यांच्‍या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आणि तृणमूलमधील मतभेद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन दोन्‍ही पक्षांमध्‍ये फूट पडल्‍याचे संकेत मानले जात आहेत.

West Bengal Congress : काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकतो

माध्‍यमांशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्‍हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना काँग्रेससोबत युती नको असेल तर काँग्रेस सारखा सर्वात मोठा जुना पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो.आम्ही भिक्षा मागितली नाही. ममता बॅनर्जींनी स्वतः सांगितले की त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममता बॅनर्जींच्या दयेची गरज नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या आहेत. याला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची इंडिया आघाडीचे संयोजक करावे, असा पुनरुच्चार तृणमूल काँग्रेसने केला आहे. खर्गे दलित समाजाचे आहेत, ते लोकसभेच्‍या ५८ मतदारसंघांवर प्रभाव पाडू शकतात, सूत्रांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्‍या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर तृणमूल काँग्रेसने 31 डिसेंबर 2023 पर्यंत जागा वाटपाचा तपशील मागवला होता. त्यानंतरची अंतिम मुदत संपली आहे, इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकलेले नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news