Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra : ‘मणिपूर ते मुंबई’… असा असेल ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा प्रवास | पुढारी

Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra : 'मणिपूर ते मुंबई'... असा असेल 'भारत जोडो न्याय यात्रे'चा प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा रविवारी १४ जानेवारीपासून सुरू होणार असून, याचे नाव ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असणार आहे. वांशिक हिंसाचाराने होरपळलेल्या मणिपूरमधून राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रारंभ होऊन बुधवारी २० मार्चला मुंबईमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज (दि.४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ असे  नाव स्पष्ट झाले. दरम्यान भारत जोडो यात्रेने देशभरात दिलेला संदेश, या यात्रेतील प्रवासादरम्यान आम्ही त्याला पुढे नेऊ. ‘भारत जोडो न्याय यात्रे’ दरम्यानच्या भेटीदरम्यान राहुल गांधी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाबाबत आपले विचार जनतेसमोर मांडतील’, असे देखील जयराम रमेश यांनी स्‍पष्‍ट केले. (Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra)

६६ दिवसांमध्‍ये एकूण ६ हजार ७०० किलाेमीटरचा प्रवास

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी एकूण ६ हजार, ७०० किमीचा प्रवास करणार आहे. ही यात्रा ६६ दिवसाच्या कालावधीत देशातील ११० जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे. यामध्ये लोकसभेचे १०० तर विधानसभेचे ३३७ मतदारसंघ येतात. महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमधून एकूण ४८० किमी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ प्रवास करणार आहे. (Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra)

Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra: “भारत जोडो न्याय यात्रे” चा मार्ग

📍मणिपूर ते मुंबई (१४ जानेवारी-२० मार्च) 

📍प्रवास अंतर: 6,700 किमी. पेक्षा जास्त

📍67 दिवस, 110 जिल्हे, 100 लोकसभा, 337 विधानसभा

राज्‍यनिहाय प्रवास  

• मणिपूर 107 किमी | 4 जिल्हे
• नागालँड २५७ किमी | 5 जिल्हे
• आसाम ८३३ किमी 17 जिल्हे
• अरुणाचल प्रदेश 55 किमी | 1 जिल्हे
• मेघालय 5 किमी 1 जिल्हे
• पश्चिम बंगाल ५२३ किमी | 7 जिल्हे
• बिहार 425 किमी | 7 जिल्हे
• झारखंड 804 किमी | 13 जिल्हे
• ओरिसा 341 किमी | 4 जिल्हे
• छत्तीसगड ५३६ किमी 7 जिल्हे
• उत्तर प्रदेश 1,074 किमी | 20 जिल्हे
• मध्य प्रदेश ६९८ किमी | 9 जिल्हे
• राजस्थान 128 किमी | 2 जिल्हे
• गुजरात. 445 किमी | 7 जिल्हे
• महाराष्ट्र 480 किमी 6 जिल्हे

हेही वाचा:

Back to top button