Bharat Nyay Yatra : राहुल गांधींची ‘भारत जोडाे’ झाली ‘भारत न्‍याय’! १४ जानेवारीपासून मणिपूरमधून प्रारंभ | पुढारी

Bharat Nyay Yatra : राहुल गांधींची 'भारत जोडाे' झाली 'भारत न्‍याय'! १४ जानेवारीपासून मणिपूरमधून प्रारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍या भारत जोडो पदयात्रेचे नाव आता ‘भारत न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे. १४ जानेवारीपासून सुरू होणारी ही ‘भारत न्याय यात्रे’ची मणिपूरपासून सुरू होऊन महाराष्ट्रातील मुंबई येथे सांगता होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज (दि.२७)  पत्रकार परिषदेत दिली. (Bharat Nyay Yatra)

Bharat Nyay Yatra : १४ राज्‍यांतील ८५ जिल्‍ह्यांमधून ६,२०० किलोमीटरचा प्रवास…

राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत 14 राज्यांमधील तब्बल 85 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात 6,200 किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून या यात्रेचा शुभारंभ करतील, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या आणि उत्तरेकडील काश्मीरमध्ये संपलेल्या भारत जोडो यात्रेला “ऐतिहासिक यात्रा” होती, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. आता, राहुल गांधी पहिल्या भारत जोडो यात्रेचा अनुभव घेऊन एक यात्रा करत आहेत. ही यात्रा तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणारी असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेने केला 4,500 किलोमीटरचा प्रवास

भारत न्याय यात्रेची घोषणा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आली आहे, ज्यामध्ये काँग्रेस आणि त्याचे भारतीय गटाचे सदस्य भाजपचा पाडाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Back to top button