Ayodhya Ram Mandir : रामलल्लाला तिहेरी तलाक पीडिता स्वत:च्या हाताने बनवलेले कपडे देणार भेट

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाला तिहेरी तलाक पीडिता स्वत:च्या हाताने बनवलेले कपडे देणार भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारत असलेल्या राम मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार आहे. राममंदिराच्या उभारणीमुळे श्रद्धेबरोबरच सामाजिक सलोखाही वाढत आहे. तिहेरी तलाक पीडिता २६ जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यावेळी या महिला रामलल्लासाठी स्वतःच्या हातांनी बनवलेले वस्त्रही भेट देणार आहेत. हे कापड बरेलीच्या प्रसिद्ध जरी जरदोजीपासून तयार केले जात आहे.

संबंधित बातम्या : 

तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवणाऱ्या मेरा हक फाऊंडेशनच्या अध्यक्षा फरहत नक्वी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिला राम मंदिराच्या उभारणीत हातभार लावण्यासाठी मोहीम राबवून निधी गोळा करत आहेत. या महिला बरेली, बदाऊन, रामपूर, मुरादाबाद, मेरठ, प्रयागराजसह ३० जिल्ह्यांतून देणगी गोळा करणार आहेत. ही देणगी राम मंदिर ट्रस्टला सुपूर्द करणार आहेत. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याशी निगडित असलेल्या फरहत म्हणतात, "जर हिंदू समाजाने ईदगाहसाठी जमीन दान केली तर मंदिराच्या उभारणीत आपण सहकार्य का करू शकत नाही?"

रामलल्लाला मोतीजडीत वस्त्र

रामलल्लाला जी वस्त्र दिली जाणार आहेत ती मोत्यांनी जडवलेले असतील. ट्रस्टकडून परवानगी मिळाल्यास या महिला दरवर्षी स्वत:च्या हाताने रामलल्लालासाठी कपडे तयार करतील, असेही त्‍यांनी सांगितले.

मुस्लिम समाजाकडून सतत पाठिंबा

राम मंदिर उभारणीच्या मोहिमेलाअनेक ठिकाणी मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळाला. दोन वर्षांपूर्वी पाटण, नेपाळ येथील डॉक्टर दाम्पत्य हमीद मन्सूरी आणि मुमताज यांनी रामललाचे दर्शन घेतले होते. देणगी देताना तामिळनाडूचे डब्ल्यूएस हबीब म्हणाले की, त्यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा पहायचा आहे. अलीकडेच काशी प्रांतातील २७ जिल्ह्यांतील ४ हजारांहून अधिक मुस्लिमांनी देणगी दिली आहे.

जरी जरदोजी म्हणजे काय?

जरी जरदोजी ही भरतकामाची एक शैली आहे, जी १२ व्या शतकात मध्य आशियातून भारतात आली. ही कला श्रीमंत वर्गातील लोकांना खूप आवडली. आजच्या काळात ती पुन्हा लोकप्रिय होत आहे. जरी जरदोजी मऊ कपडे, जरी कपडे आणि रेशमी कपड्यांवर भरतकाम केले जाते. यासाठी प्राचीन काळी सोन्याचांदीचा धागा वापरला जात असे. याशिवाय लहान मोती आणि रत्नेही वापरली जात.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news