

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील डेरेगाव येथे बस आणि ट्रकच्या धडकेत १४ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. डेरेगावजवळील बलिजन परिसरात पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
४५ प्रवाशांना घेऊन ही बस तिनसुकियाच्या तिलिंगा मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. आज पहाटे तीन वाजता बसमधून सुमारे ४५ लोक आठखेलियाहून बालीजानच्या दिशेने पिकनिक पार्टीसाठी जात होते. वाटेत डेरेगाव जवळ मार्गेरिटा येथून आलेल्या कोळशाने भरलेल्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २७ जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि जोरहाट वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :