झारखंडचे मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍या निकटवर्तींयावर ‘ईडी’चे छापे | पुढारी

झारखंडचे मुख्‍यमंत्री सोरेन यांच्‍या निकटवर्तींयावर 'ईडी'चे छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍या निकटवर्तींयावर आज (दि.३) पहाटे सक्‍तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकले. या धडक कारवाईने झारखंडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ( Jharkhand illegal mining case ) ‘ईडी’ची कारवाई ही आपल्‍या विरोधातील राजकीय षड्‍यंत्र असल्‍याचा आरोप हेमंत सोरेन यांनी मंगळवारी( दि.२) केला होता.

आज पहाटे ईडीने सोरेन यांचे माध्‍यम सल्लागार अभिषेक प्रसाद उर्फ पिंटू यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ईडीचे पथकाकडून 12 ठिकाणी झडती घेण्यात येत असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. ( Jharkhand illegal mining case )

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आतापर्यंत सात वेळा ईडीने बचावलेले समन्‍स टाळले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्‍यात आली आहे. यामध्‍ये २०११ च्‍या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button