Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; चार जणांची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; चार जणांची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा धुमसत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील थौबलमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात अनेक जण जखमीही झाले आहेत. यानंतर खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली.

थौबल जिल्ह्यातील स्थानिकांनी दावा केला आहे की, लोकांचा एक गट, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते खंडणीसाठी शस्त्रे घेऊन आले होते. या हिंसाचारानंतर थौबल, इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशात हिंसाचाराचा निषेध केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.

विविध घटनांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू

२०२३ मध्ये मणिपूर नेहमी चर्चेत राहिले. ३ मे रोजी येथे सर्वात हिंसक घटना घडली. राज्यातील विविध घटनांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० हजार लोक बेघर झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button