मटणाच्या जेवणात नळी नसल्याने मोडले लग्न | पुढारी

मटणाच्या जेवणात नळी नसल्याने मोडले लग्न

हैदराबाद : साखरपुड्याच्या जेवणात मुलाकडच्या मंडळींना मटणाच्या जेवणात नळी देण्यात आली नाही म्हणून संतापलेल्या वरपक्षाने चक्क लग्नच मोडल्याची घटना तेलंगणात घडली. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी करूनही मार्ग निघू शकला नाही. निझामाबाद जिल्ह्यातील एका मुलीचा जगतियाल येथील तरुणाशी विवाह निश्चित झाला होता. निझामाबाद येथे त्यांचा साखरपुडाही झाला. पण नंतरच्या जेवणावळीत सारे बिघडले.

मुलीकडच्यांनी मुलाकडच्या मंडळींसाठी मटणाच्या जेवणाचा बेत आखला होता. पंगती बसल्या आणि ताटात मटण आले. पण मुलाकडच्या एकाही व्यक्तीच्या ताटात नळी आली नाही म्हणून मुलाकडच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीचे वादावादीत रूपांतर झाले. मुलीकडच्या मंडळींनी आपण नळीसह जेवण देण्यात चुकल्याचे मान्यही केले. पण वाद वाढतच गेला. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर त्यांनीही मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण मटणाच्या जेवणात नळी नाही हा आमचा अपमान आहे, असे म्हणत वरपक्षाने चक्क लग्न मोडल्याची घोषणा करीत तेथून काढता पाय घेतला.

हेही वाचा : 

Back to top button