JN1Covid Variant : आठ राज्यात आढळला JN.1; जानेवारीत कोरोना संसर्ग आणखी वाढणार! | पुढारी

JN1Covid Variant : आठ राज्यात आढळला JN.1; जानेवारीत कोरोना संसर्ग आणखी वाढणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या चार आठवड्यांत देशात कोरोनाचा (JN1Covid Variant) संसर्ग वाढू शकतो. इतकेच नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इन्साकॉग (INSACOG) अहवालाच्या आधारे ही भीती व्यक्त केली आहे. २६ डिसेंबरपर्यंत देशात आठ राज्यात एकूण १०९ JN.1 कोविड प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. (JN1Covid Variant)

संबंधित बातम्या : 

नोव्हेंबरमध्ये केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पहिले चार रुग्ण आढळले होते. मात्र आता गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा आणि राजस्थानमध्येही आढळले आहेत. मंगळवारी २६ डिसेंबरपर्यंत देशात एकूण १०९ JN.1 कोविड प्रकारच्या रूग्णांची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये ३६, कर्नाटकात ३४, गोव्यात १४, महाराष्ट्रात ९, केरळमध्ये ६, राजस्थान ४, तामिळनाडू ४ आणि तेलंगणामध्ये २ रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (JN1Covid Variant)

JN1Covid Variant : जानेवारीत संख्या वाढते

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि २०२० ते २०२२ पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोना रूग्णसंख्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉन प्रकारामुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान दररोज रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात हा आलेख घसरण्यास सुरुवात झाली.

JN.1 उपप्रकार वेगाने पसरतो

सध्या, JN.1 उप-प्रकार पसरत आहे. त्याचा संसर्ग पसरण्याचा दर जादा आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिसणारी वर्दळ आणखी तीन आठवडे राहण्याची भीती आहे. त्यानंतरच कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवीन उपप्रकार किती काळ स्थिर राहू शकतो हे सांगता येत नाही, असेही अधिकाऱ्यांचे मत आहे.

हेही वाचा : 

Back to top button