बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, महाराष्‍ट्रासह चार राज्‍यांमध्‍ये 'एनआयए'चे छापे | पुढारी

बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, महाराष्‍ट्रासह चार राज्‍यांमध्‍ये 'एनआयए'चे छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) चार राज्‍यांमध्‍ये छापे टाकून बनावट नोटांचे निर्मितीचे रॅकेट उद्‍ध्‍वस्‍त केले. महाराष्‍ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या कारवाईत ५००, २०० आणि १०० रुपयांच्‍या बनावट नोटांसह प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट्ससह जप्त करण्यात आल्या आहेत. ( Fake currency racket busts )

सीमेपलीकडे बनावट नोटांची वाहतूक करणे आणि भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या चलनाला वापर करण्‍याच्‍या  मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींवर छापे मारण्यात आले. या कारवाईसंदर्भात ‘एएनआय’शी बोलताना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरचे अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक सुधीर जयस्‍वाल यांनी सांगितले की, राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या बंगळूर येथील टीमने विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंगला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन फोन जप्त करण्यात आले. बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. ( Fake currency racket busts )

हेही वाचा : 

Back to top button