Fake currency case: दहशतवादी ‘अंकल’ चा भारतीय अर्थव्यवस्थेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न; NIA चे आरोपपत्र

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: ठाण्यातील बनावट नोटा प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल (२७ सप्टेंबर) घोषित दहशतवाद्यांसह तीन जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. बनावट नोटा जवळ बाळगत दहशतवादी घोषित 'अंकल' उर्फ जावेद पटेल उर्फ जावेद चिकना याने भारतीय अर्थव्यवस्थेला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी NIA तपास संस्थेने पुरवणी  आरोपपत्र दाखल केले आहे. बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व जण मुंबईचे असल्याचे एनआयएतर्फे सांगण्यात आले आहे. (Fake currency case) या संदर्भातील माहिती NIA तपास संस्थेने त्यांच्या 'X' अकाऊंटवरून दिली आहे.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायद्याच्या कलमांतर्गत घोषित दहशतवादी, अंकल उर्फ जावेद पटेल उर्फ जावेद चिकना याच्यासोबत रियाझ शिकिलकर, मोहम्मद फयाज शिकीलकर आणि नासिर चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व मुंबईचे रहिवासी आहेत. फयाजवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fake currency case)

या प्रकरणातील तीन आरोपींवर मागील वर्षी एप्रिलमध्ये ठाणे पोलिसांनी बनावट नोटा बाळगल्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर हे प्रकरण एनआयएने ताब्यात घेतले आणि तपासानंतर, बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी मे २०२३ मध्ये फयाजला अटक केली होती. फयाज हा अंकल उर्फ जावेद पटेल उर्फ जावेद चिकना यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात होता. त्याने भारतात बेकायदेशीर कारवाया करण्याचा कट रचला होता, असेही तपासात समोर आले आहे. त्याला 'अंकल' उर्फ जावेद पटेल उर्फ जावेद चिकना याचा सहकारी सहकारी 'भाई' मार्फत पाठवलेला निधीही मिळाला होता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news